चिंताजनक! हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येणार

कोरोनाचा जगभरात हाहाकार सुरूच आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे काम अंतिम टप्प्यात आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) चिंता वाढविणारा इशारा दिला आहे.

यूरोपसह जगभरातील अनेक भागात हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येईल, अशी शक्यता डब्लूएचओने वर्तवली आहे. लोकांना हिवाळ्यापूर्वी तयार राहण्याचा सल्लाही दिला आहे.

यूरोपमधील डब्ल्यूएचओचे रिजनल डायरेक्टर हेनरी क्लग म्हणाले : हिवाळाच्या ऋतूत तरुणांपेक्षा वृद्धांना हा आजार मोठ्या प्रमाणात होईल.

मृत्यूदरात वाढ

या काळात हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या अधिक असेल, मृत्यूदरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

मजबूत

युरोपीय क्षेत्रात ५५ पेक्षा ३२ राज्यांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये १४ दिवसांच्या काळात कोरोना बाधितांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. आता आरोग्य अधिकारी फेब्रुवारीच्या तुलनेत अधिक तयार आणि मजबूत स्थितीत आहेत.

तयारी

जगभरातील देशांनी यानुसार आताच तयारी सुरू करायला हवी, असेही हेनरी क्लग यांनी सांगितले आहे.

You might also like
Leave a comment