केळी मावा मोदक

गणपती बाप्पाच्या आगमनाने निसर्ग देखील प्रफुल्लित होतो. मग त्याच निसर्गाचं देणं असणारी फळं, फुलं आपण बाप्पाला अर्पण करावीत असाच त्यामागचा हेतू असतो. चला तर मग आज अशाच एका फळाचा मोदक बाप्पाला नैवैद्य म्हणून अर्पण करूयात.

साहित्य

कप मावा, 3 केळी बारीक काप केलेली, अर्धा कप साखर (बारीक केलेली), 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा व्हॅनिला इन्सेस

कृती

प्रथम एका कढईत केळी आणि साखर टाकून 5 ते 10 मिनिटे परतून घ्या. म्हणजे केळी चांगली एकजीव होऊन मिश्रण तयार होईल. नंतर थंड होऊ द्या. (कॅरमलसारखा रंग येईल.)

नंतर मावा एक कढईत 5 ते 10 मिनिटे भाजून घ्या आणि थंड होऊ द्या.

दोन्ही मिश्रणे थंड झाल्यानंतर माव्याचे मिश्रण मळून घ्या. नंतर त्यात केळीचे मिश्रण टाका आणि चांगले एकजीव करा. त्यात व्हॅनिला इन्सेस आणि वेलची पावडर टाका. मिश्रण घट्ट झाल्यास आणि गरज भासल्यास थोडे दूध घाला.

आता मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून मोदकाच्या साच्यात टाकून आकार द्या आणि मोदक तयार करून घ्या. या मिश्रणातून 5 ते 6 मोदक तयार होतील.

Leave a comment