म्हणून काकडीचे आवर्जून सेवन कराच!
सर्व ऋतुत काकडी सहज उपलब्ध होते. काकडी खाण्याने शरीराला पाणी आणि थंडावा मिळतो. याच्या बियांचाही आपल्याला खूप फायदा होतो.
काकडी खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे
- अपचन, उलटी, मळमळ, पोट फुगल्यासारखं वाटणं यावर गुणकारी.
- पोटाला थंडावा मिळतो.
- जर भूक मंदावली असेल तर काकडीचे काप करून त्यावर पुदीना, काळं मीठ, लिंबाचा रस, मिरे, जिरेपूड घालून खा.
- डोळ्यांखाली काळी वर्तुळं आल्यास काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा.
- चेहऱ्यावरील डाग/ काळवटपणा दूर करायचा असेल तर काकडीचा रस, लिंबाचा रस आणि दूध एकत्र करून चेहऱ्यावर मसाज करा
- चटका बसला असेल किंवा भाजले असेल त्यावर काकडीचा रस लावा.
- काकडी रोज खाल्ली तर पोट साफ होण्यास मदत होते.
- आम्लपित्त, गॅसेस, आंत्रव्रण (अल्सर) असे विकार असतील तर काकडीचा कीस किवा काकडीचा रस 2-4 तासांनी प्या.
- काकडीचा कीस चेहरा, मान यावर नियमितपणे लावला तर चेहऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या, सुरकुत्या दूर होतात.
- काकडीचा रस केसांना लावला तर त्यात असणाऱ्या सिलिकॉन व गंधकामुळं केस गळायचे थांबतात.
काकडी कधी खाऊ नये?
- हिवाळ्यात आणि पावसाळ्यात शक्यतो ककाडी प्रमाणात खा.
- कफजन्य समस्या असतील तर काकडी खाऊ नये.