गीतकार जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस

आपल्या लेखणीच्या जोरावर रसिकांना भुरळ घालणारे ज्येष्ठ कवी जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस.

गीतकार जावेद यांचा जन्म 17 जानेवारी 1945 ला ग्वाल्हेर येथे झाला असून त्यांचं लहानपणी नाव ‘जादू’ असे होते.

गीतकार जावेद अख्तर यांची कारकिर्द :

  • शायरीचा वारसा जावेद यांना वडिलांकडून मिळाला आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं.
  • गीतकार जावेद अख्तर ‘पटकथाकार’ म्हणून एकेकाळी हरएक चित्रपटामागे असलेलं त्यांचं नाव गेल्या कित्येक वर्षांत पडद्यावर उमटलेलंच नाही.
  • 1970 ते 1980 च्या दशकात सलीम खान-जावेद अख्तर या जोडीने अनेक दर्जेदार चित्रपट रसिकांना दिले.
  • ‘अंदाज’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘डॉन’ या त्यांच्या चित्रपटांना सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
  • 1993 साली जावेद अख्तर यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे शेवटची पटकथा लिहिली होती.
  • ‘सिलसिला’ चित्रपटापासून अलीकडच्या ‘दिल चाहता है’ चित्रपटामधील गीतांनी युवापिढीचे भावविश्व भारून टाकले.
  • जावेद यांना ‘पद्मभूषण’, ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत
  • आज चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला पन्नास पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत.
Leave a comment