
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आणि डाक विभागाने ग्राहकांच्या सुविधेसाठी डाकपे अॅप लाँच केले आहे. हे गुगल पे सारखे काम करते. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्याच बँकिंग आणि पोस्ट ऑफिस सुविधांचा लाभ घेऊ शकता. पोस्टात खाते नसलं तरी देखील तुम्ही या App
कोणत्या सुविधांचा मिळेल फायदा? :
- या अॅपच्या मदतीने तुम्ही Domestic Money Transfers अर्थात DMT च्या माध्यमातून पैसे पाठवू शकता.
- याशियाव गुगल पे प्रमाणे क्यूआर कोड वापरूनही पैसे पाठवू शकता.
- व्हर्च्यूअल डेबिट कार्ड आणि यूपीआयच्या माध्यमातून कोणतंही सर्व्हिस किंवा व्यापारिक पेमेंट करता येईल.
- या माध्यमातून बँकिंग सर्व्हिस आणि पोस्टल प्रोडक्ट्सचा ऑनलाइन लाभ देखील घेता येईल.
- ग्राहक विविध आर्थिक सेवांचा फायदा या अॅपच्या माध्यमातून घेऊ शकतात.
DakPay चा वापर असा करा
- प्ले स्टोअरवर App डाऊनलोड करा आणि तुमची प्रोफाइल बनवा.
- DakPay डाऊनलोड लिंक
- यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक, नाव, पिन कोड आणि खाते क्रमांक प्रविष्ट करा.
- त्यानंतर हे अॅप तुम्हाला बँक खात्याशी लिंक करा.
- UPI App प्रमाणे या अॅपमध्ये देखील तुम्हाला 4 अंकी पिन बनवावा लागेल.
- हे अॅप तुम्ही किराणा दुकान ते शॉपिंग मॉल कुठेही वापरू शकता
दरम्यान या अॅपच्या मदतीने गावामध्ये राहणाऱ्या लोकांना देखील बँकिंग सुविधांचा फायदा मिळणार आहे.
Leave a Reply