जाणून घ्या एका दिवसात किती पाणी प्यायले पाहिजे?

निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायले हवे सांगितले जाते? मात्र यामागे काय सत्यता आहे? ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात!

पाणी पिण्याचे फायदे

  • युरिन, घामाद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
  • शरीराचे तापमान सामान्य राहते.
  • किडनी निरोगी राहते.
  • चेहरा आणि स्किनवर ग्लो येतो.
  • शरीर हायड्रेट राहते.
  • वजन नियंत्रणात राहते.

एका दिवसात किती पाणी आवश्यक?

हे तुमचे शरीर, वय, तुमचे काम आणि जीवनशैलीवर अवलंबून आहे. काही लोकांना 8 ते 10 ग्लास पाणीसुद्धा दिवसभरात कमी पडू शकते.

शरीराची गरज ओळखा

तज्ज्ञ सांगतात की, शरीराची पाण्याची मागणी पहा आणि तेवढे पाणी प्या. मात्र गरजेपेक्षा जास्त पाणी पिऊ नका, यामुळे नुकसान होऊ शकते.

असे ओळखा पाण्याचे योग्य प्रमाण

जर तुमची युरिन सुद्धा हलकी पिवळी किंवा रंगहीन दिसत असेल तर हा संकेत आहे की तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात.

हे सुद्धा एक तथ्य आहे की, पाण्याच्या कमतरतेची लेव्हल केवळ पाणी पिण्यानेच पूर्ण होत नाही तर तुम्ही दिवसभरात जी फळे, भाज्या, चहा, कॉफी, बीयर, एनर्जी ड्रिंग किंवा दुसर्‍या वस्तू घेता, त्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतो. ते सुद्धा तुमच्या शरीराची पाण्याची मागणी पूर्ण करतात. यासाठी तहानेकडे दुर्लक्ष करू नका आणि जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा पाणी प्या.

You might also like