ATM चा वापर करता? …तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी
येत्या काही दिवसांत ATMमधून पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास ग्राहकांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.
हे तुमच्या विनामूल्य पाच व्यवहारांमध्ये समाविष्ट होणार नाही, ज्यासाठी तुम्हाला एक वेगळी रक्कम द्यावी लागेल.
जेव्हा तुम्ही ATM मधून 05 हजाराहून अधिक पैसे काढणार तेव्हाच हे लागू होणार असल्याचे सांगितल जात आहे.
एकाच वेळी पाच हजाराहून अधिक रक्कम ATM मधून काढण्यासाठी एका ग्राहकाला 24 रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागतील.
सध्या एटीएममधून पाच मोफत व्यवहार करता येऊ शकतात. त्यानंतर जर त्याच महिन्यात सहावा व्यवहार झाला तर त्यावर ग्राहकाला 20 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागते.
आरबीआयने नेमलेल्या समितीच्या शिफारशींनुसार आठ वर्षांनंतर ATMच्या शुल्कामध्ये बदल होऊ शकतो.