लसूण खाण्याचे असेही फायदे…

लसूण Garlic

आपल्या आहारातील अविभाज्य घटक असणाऱ्या लसणाचे अनेक गुणधर्म आहेत. तसेच त्यामुळे भाज्यांना वेगळी चव आणि वास येतो. आज आपण लसूण खाण्याचे काही विशेष फायदे पाहणार आहोत…

  • बहिरेपणा, कुष्ठ – रोग, संधिवात, मुळव्याध, यकृताचे आणि पित्ताशयाचे विकार, डांग्या खोकला, रक्तदोष, घटसर्प या साऱ्या आजारांवर लसणाचा वापर केला जातो.
  • अनेक वेळा लोकांना दमा किंवा श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर त्यावेळी सुद्धा लसणाचा वापर केला जातो.
  • शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. कारण लसणात असणारे लोह रक्त तयार होण्यास आवश्यक असते.
  • पचन विकार वाढवण्याची क्षमता ही लसणामध्ये जास्त प्रमाणात असते.
  • सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे.
  • लसणाच्या वापरामुळे कर्करोग या आजाराची भीती काही अंश कमी होते.
  • लसणाचा काढा करून खाज येणाऱ्या भागात लावले तर लवकरात लवकर त्वचेच्या आजरापासून तुमची सुटका होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*