लविनाच्या आरोपांना महेश भट्ट यांचं प्रत्युत्तर
महेश भट्ट हे बॉलिवूडमधील डॉन आहेत. त्यांच्या एका फोनमुळे एखाद्या कलाकाराचं आयुष्य उद्धस्त होऊ शकतं, असा खळबळजनक आरोप लविना लोध हिने केला आहे.
लविना ही महेश भट्ट यांचा भाचा सुमित सभरवाल याची पत्नी आहे. तिच्या या आरोपांवर आता महेश भट्ट यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
त्यांनी लविना विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक कोटी रुपयांचा मानहानिचा दावा ठोकला आहे.
महेश भट्ट आणि त्यांच्या कुटुंबियांनी लविनाने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.
भट्ट कुटुंबियांना केवळ बदनाम करण्यासाठी लविनाने हे आरोप केले आहेत असा दावा महेश भट्ट यांनी केला आहे.
तिने आपले सर्व आरोप मागे घेऊन माफी मागावी अन्यथा आमच्यासमोर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असाही इशारा महेश भट्ट यांनी दिला आहे.