कान स्वच्छ करण्याची पध्दत काय?
आपण आपला कान वेळोवेळी स्वच्छ करणे देखील खूप महत्वाचे असते. कारण असे केले नाही तर कान दुखणे, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा बहिरापणासारख्या समस्या उद्भवू शकतात. कान साफ कसे करावे? हे जाणून घेऊया…
- गरम पाणी : प्रथम पाणी कोमट करून ते कापसाच्या मदतीने कानात टाका. कान थोडा वेळ तसाच राहू द्या आणि काही सेकंदांनंतर, कान उलट करा आणि पाणी बाहेर काढा.
- तेल : ऑलिव, शेंगदाणा किंवा मोहरीच्या तेलात थोडासा लसूण घालून गरम करा. आता हे तेल कोमट झाल्यावर ते कापसाच्या साहाय्याने कानात घालून थोड्यावेळ तसेच ठेवा.
- कांद्याचा रस : थोडा गरम करून कांद्याचा रस काढा. आता ड्रॉपर किंवा कापसाच्या मदतीने कांद्याच्या रसातील काही थेंब कानात घाला.
- मीठ आणि पाणी : गरम पाण्यात मीठ मिसळून एकजीव करून घ्या. आता काही थेंब कापसाच्या मदतीने कानात घाला आणि नंतर कान उलटा करून पाणी काढून टाका.
लक्षात ठेवा की, वरील पद्धती कान दुखणे किंवा खरचटने आणि जखमा झाल्यास अवलंबू नका.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी लेट्सअप घेत नाही.