कोबीची वडी

साहित्य

 • २०० ग्रॅम कोबी
 • १ मोठी जुडी कोथिंबीर
 • ६-७ हिरव्या मिरच्या
 • १ वाटी (भरून) डाळीचे पीठ
 • २ चमचे मीठ (चवीनुसार)
 • ३ मोठे चमचे तेल
 • अर्धा चमचा मोहरी
 • अर्धा चमचा जिरे
 • पाव चमचा हिंग
 • अर्धा चमचा हळद
 • तळणीसाठी तेल

कृती

• कोथिंबीर निवडून बारीक चिरावी. कोबी चिरवी व मिरच्या बारीक वाटाव्य

• तेल तापले की मोहरी, जिरे, हिंग, हळद क्रमाने घालून त्यावर कोबी घालवी. ३-४ मिनिटे ढवळावे.

• डाळीच्या पिठात मीठ व पाणी घालून गुळगुळीत मिश्रण कालवावे. कोबीवर हे पीठ ओतावे व मंद आंचेवर शिजू द्यावे.

• एका थाळीला किंवा ट्रेला तेलाचा हात फिरवून त्यावर हे पीठ थापावे. तेलाच्या हाताने पृष्ठभाग सारखा करावा.

• गार झाले की चौकोनी वड्या कपाव्या. तव्यावर बाजूने तेल सोडून परताव्या. सॉस, चटणीबरोबर खायला द्याव्यात.

You might also like
Leave a comment