असे आहे रिझ्यूमचे शास्त्र! Resume कसा बनवतात?
सध्याचा काळ पाहता नोकरी मिळवणे किती कठीण आहे? याबाबत फार काही वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र आपला Biodata किंवा Resume व्यवस्थित तयार असेल तर तुमचे पहिले इम्प्रेशन चांगले पडेल.
अनेकदा काही विद्यार्थी या बाबतीत हलगर्जीपणा करतात. त्यामुळे अन्य अनेक चांगल्या पात्रता अंगी असूनही त्यांना नोकरी मिळू शकत नाही. त्यांनी Resume तयार करण्याच्या बाबतीत दक्षता घेतली तर त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळणे सोपे जाते.
आपण नोकरीसाठी अर्ज करतो तेथे अगोदरच हजारो अर्ज आलेले असतात. त्यानंतर प्रारंभिक पडताळणी किंवा छाननी होते. त्यामुळे आपल्या रिझ्यूममध्ये काही तांत्रिक चुका असतील तर या छाननीत आपला अर्ज बाद होऊ शकतो.
काही कंपन्यांमध्ये काही कीवर्ड निश्चित झालेले असतात. त्याआधारे आपल्याला आपली माहिती द्यावी लागते. डोमेन एरिया, स्कील्स्, डेसिग्नेशन असे ते विशिष्ट शब्द असतात. त्याच्या आधारे पहिली छाननी होते.
Resume ची छाननी करताना पहिल्या काही सेकंदात तिथले कर्मचारी तीनच गोष्टी प्राधान्याने बघत असतात.
- हा उमेदवार आता कोठे आहे?
- यापूर्वीच्या त्याने काम केलेल्या दोन कंपन्या कोणत्या? त्या कंपन्यात तो कोणत्या पदावर काम करत होता?
- त्याची शैक्षणिक पात्रता काय? या गोष्टी नवी नोकरी मिळविण्यासाठी आपल्याकडे आहेत हे अर्जातून पटकन दिसले पाहिजे.
Resume मध्ये या गोष्टी टाळा!
रिझ्यूममध्ये उगाचच चित्र विचित्र फॉन्टचा वापर करू नका. फार अलंकारिक फॉन्ट न वापरता टाईम्स रोमन किंवा एरियल यासारखा व्यवहारात नेहमी वापरला जाणारा फॉन्ट वापरला पाहिजे . 12 ते 14पॉईंट फॉन्ट साईज वापरला पाहिजे.
दोन ओळीतले अंतर सुद्धा योग्य ठेवले पाहिजेत. आपल्या रिझ्यूममध्ये निरनिराळ्या प्रकारचे ग्राफ्स्, टेबल्स्, चित्रे, छायाचित्रे, स्पेशल इफेक्ट्स दाखविणारे ग्राफिक्स हे टाळले पाहिजे. रिझ्यूम टाईप करताना स्पेलिंगच्या चुका करता कामा नयेत.