कडिपत्त्याचे आरोग्यदायी फायदे

स्वयंपाक घरात नेहमी वापरला जाणार घटक म्हणजे ‘कडिपत्ता’. पदार्थाला एक विशेष चव आणण्याखेरीज कडिपत्त्याचे अनेक फायदेही आहेत. ते पाहुयात…

1) कडिपत्ता हे लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडचा मोठा स्त्रोत आहे. कडिपत्ता अ‍ॅनिमिया आजार रोखण्यासही मदत करतो.

2) अतिशय मद्यपान करणाऱ्या लोकांच्या जेवणात कडिपत्त्याचा वापर करणं फायदेशीर ठरतं. मद्यपानामुळे शरीरात ऑक्सिडेटिव स्ट्रेस आणि टॉक्सिन्स तयार होत असतात. जेवणात कडिपत्त्याचा वापर फायदेशीर ठरतो.

3) कडिपत्त्यामध्ये फायबर असतं. ते रक्तातील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड-शुगर लेवल कमी करण्याचे काम करते.

4) कडिपत्ता पचनशक्ती सुरळित करतो. वजन कमी करण्यासाठीही कडिपत्ता फायदेशीर आहे.

5) मधुमेह आणि सतत वजन वाढणाऱ्या लोकांसाठी कडिपत्ता खाणं अतिशय गुणकारी आहे.

6) कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कडिपत्ता प्रमुख भूमिका बजावतो.

7) तेलात कडिपत्त्यांची पानं उकळवून ते तेल केसांना लावल्याने केस गळती कमी होण्यासही मदत होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.