बोलण्यातील तोतरेपणामागील काही शास्त्रीय कारणे

प्रत्येकाला आपले व्यक्तिमत्व सुंदर आणि आकर्षक असावे असे वाटते. व्यक्तिमत्त्वात अनेक पैलू येतात. आपलं दिसणं, आपलं हसणं आणि आपली भाषा या गोष्टी आपल्याला जगापुढे सादर करत असतात.

लहान मूल जेव्हा तोतरे बोलते तेव्हा, आपल्याला ते गोड वाटते. आपण त्याचे लाड सुद्धा करतो. मात्र, एका विशिष्ट वयात आपल्याला स्पष्ट उच्चार किती महत्वाचे असतात ते कळते.

आपले म्हणणे समोरच्याला कळण्यासाठी आपले उच्चार स्पष्ट असायला हवेत. मात्र, काही लोकांना हा तोतरेपणा येतो त्यामागे शास्त्रीय कारणे असतात.

तोतरेपणा किंवा बोलण्यातील दोष असणार्‍या व्यक्तीमध्ये पुढे काही वर्षांनी वेगळे दोष दिसायला लागतात. हे परिणाम जाणवण्याचे मुख्य कारण म्हणजे, बोलण्यातला तोतरेपणा मेंदूत पसरत जाणे हे असते.

बोलणे ही क्रिया फुफ्फुसाची संबंधित असते. एखादा माणूस बोलतो तेव्हा आधी त्याच्या फुफ्फुसातील स्नायू हलतात आणि नंतर ओठातले स्नायू हलतात. फुफ्फुस ते ओठ या दरम्यानचे 100 स्नायू एका सेकंदाला हलतात आणि त्या सेकंदाला 14 निरनिराळे आवाज निर्माण होतात.

एखादा माणूस तोतरा बोलतो याचा अर्थ त्याच्या या स्नायूंवर परिणाम झालेला असतो आणि या स्नायूंच्या हालचाली मेंदूवर अवलंबून असल्याने त्याचा हा दोष म्हणजे मेंदूचा दोष ठरतो. हे परिणाम जाणवण्याचे मुख्य कारण म्हणजे, बोलण्यातला तोतरेपणा मेंदूत पसरत जाणे हे असते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*