शीतपेयांमुळे वाढतो अनेक आजारांचा धोका

उन्हाळ्यात शरीराला थंडावा म्हणून अनेकजण शीतपेयाचे सेवन करतात. मात्र, शीतपेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. मुलांमध्ये स्थूलत्व वाढण्याची शक्यता- मुलांना शीतपेयाची सवय लागल्यास त्याचे शरीरावर विपरित परिणाम होतात. सतत शीतपेय प्यायल्यानं स्थूलत्वाची समस्या उद्भवते.

शीतपेयाच्या अति सेवनाने हृदयविकाराचा धोका वाढतो. सर्वसामान्यांच्या तुलनेत सतत शीतपेय पिणाऱ्यांना हृदयविकार होण्याची शक्यता २० टक्क्यांनी जास्त असते. सॉफ्ट डिंकमध्ये असलेला सोडा तोंडातील बॅक्टेरियांच्या संपर्कात आल्यावर त्याचे ऍसिडमध्ये रुपांतर होऊन गंभीर परिणाम दातांवर होतो. अशा परिस्थितीत स्टॉनं सॉफ्ट डिंक पिऊन त्यानंतर ब्रश केल्यास धोका काही प्रमाणात टाळता येतो.

शीतपेयांमुळे हाडांचे आरोग्यही धोक्यात येते. दररोज २ ग्लास कोला प्यायल्यास किडनीचे आजार होण्याची शक्यता वाढते. शिवाय शीतपेयांमधील प्रीझर्व्हटिव्झ आणि रंगांमुळे कर्करोग होण्याचीही भीती असते. शीतपेयातील कॅफेनमुळे झोपेची समस्याही निर्माण होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*