हसणे – एक उत्तम व्यायाम
१.हसण्याने शरीराचे वजन नियंत्रित राहते ,रक्तदाब कमी होतो.
२. हसण्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते .
३. हसण्याने अनेक आजार बरे होतात . त्यासाठीच अनेक ठिकाणी हास्य थेरपीचे क्लासेस चालविले जातात
४. हसताना त्या व्यक्तीचे शरीर ,मन,भावना,विचार एकरूप होतात . शरीराच्या कंपनामध्ये एक लयबध्दता येते.
५. हसण्याच्या क्रियेमुळे आपल्या स्नायूंना विसावा मिळतो ,तणाव कमी होतो . त्याचबरोबर आजूबाजूचे वातावरणच नव्हे तर चित्तही प्रसन्न होते .
६. फुफ्फुसांच्या निरोगीपणासाठी हसण्याचा व्यायाम उपयुक्त ठरतो .
७. हा व्यायाम आरोग्याच्या दृष्टीने श्रेष्ठतम असतो .
८. फुफुसांची श्वासोच्छासाची क्षमता वाढती छाती आणि पोट यांमधील पडदा,पोटाचे स्नायू ,पाचन तंत्र यांची क्रियाशीलता वाढून ते सक्रिय होतात आणि रोगप्रतिकार क्षमता वाढते .
९. हसण्याने अशक्तपणा,श्वासरोग आणि दम्याच्या विकारात लाभ होतो.
१०.जे काम दवा करू शकत नाही ते काम हसण्याने होते .
११.यामुळे अशक्तपणा ,श्वासरोग आणि दम्याच्या विकारात लाभ होतो .
१२.हसण्याच्या क्रियेत शरीराच्या कॅलरीज वापरल्या जातात यामुळे रक्तदाब कमी होतो .