ट्राय करा! पनीर पराठा रेसिपी (Paneer Paratha Recipe)
साहित्य
300 ग्रॅम गव्हाचे पीठ, 200 ग्रॅम पनीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1 इंच आल्याचा तुकडा, चिरलेली कोथिंबीर, 1 छोटा चमचा धणे पावडर, पाऊण चमचा तिखट, चवीनुसार मीठ आणि तेल/ तूप.
कृती
सुरुवातीला गव्हाचे कणिक कोमट पाण्याने मळून घ्या. नंतर पनीरमध्ये हिरवी मिरची, धणे पूड, कोथिंबीर, आले, तिखट आणि मीठ घाला. पनीरचे हे सारण कणकेच्या गोळ्यात घालून पोळी लाटा. त्यासाठी गॅसवर तवा ठेवा.
मळलेल्या पिठाचा लिंबाएवढा गोळा घेऊन त्यामध्ये पनीरचे सारण भरा. गोळा सर्व बाजूंनी बंद करा आणि पोळपाटावर पोळीसारखे गोल लाटा आणि गरम तव्यावर तूप किंवा तेल घालून खमंग पोळीसारखे भाजून घ्या. हा पराठा तुम्ही रायता, चटणी, बटाटा-फ्लॉवरची भाजी किंवा सॉससोबत सर्व्ह करू शकता.