तर अॅसिडिटी किंवा पित्ताचा त्रास येईल आटोक्यात!
नवरात्रीचे उपवास पूर्ण झाल्याने आपल्या आहारात अचानक विविध पदार्थांचा समावेश झाला आहे. अशात काही वेळा आपल्या पोटाची घडी विस्कटण्याची शक्यता असते. दरम्यान बऱ्याच लोकांमध्ये अॅसिडिटी, पित्त, अपचन या तक्रारी डोके वर आढळतात. अशावेळी कोणते उपाय करावे? हे पाहूया…
सुरुवातीला हलका आहार घ्या. एकदम जास्त किंवा जड होईपर्यंत जेवल्यास त्रास होऊ शकतो.
जेवणाच्या वेळा चोख पाळा. कारण अवेळी जेवणामुळे अपचन, अॅसिडिटीचे त्रास होणे स्वाभाविक आहे.
तूपकट, तेलकट किंवा चमचमीत पदार्थांचा समावेश आवर्जून टाळा. यामुळे अॅसिडिटी किंवा जळजळ होऊ शकते.
रात्रीच्या आहारात भाताचा समावेश. त्याबरोबर एखादी भाजी किंवा कोशिंबिरीचा समावेश करावा.
वरील काही गोष्टींचे पालन करून आपण अॅसिडिटी किंवा पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवू शकतो.