आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde

आंबा

उन्हाळा आला कि, प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतोच. मात्र आंबा खाण्याचे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. त्याबाबत जाणून घ्यायला हवे.

आंबे खाण्याचे फायदे | Benefits of eating Mango

 • आंब्यामध्ये शरीराला आवश्यक आणि वजन कमी करण्यास उपयुक्त असे अनेक घटक असल्याने उन्हाळ्यात हे फळ खायला पाहिजे.
 • आंब्यात शर्करा असल्याने शरीराला ऊर्जा मिळते. उन्हामुळे थकल्यासारखे वाटत असल्यास तुम्हाला शक्ती आल्यासारखे वाटते.
 • आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
 • चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यासाठी तसेच तुकतुकी कायम राहण्यासाठी आंबा उपयुक्त ठरतो.
 • आंब्यामुळे शरीरातील नसा, टिश्यू व स्नायू मजबूत होतात. तसेच शरीर आतून स्वच्छ होते.
 • ‘व्हिटामिन B6’ मुळे रक्तातील ‘होमोसेस्टीना’चे प्रमाण संतुलित राहते व हृद्यविकाराचा धोका कमी होतो.
 • आंब्यात फायबर्सही मुबलक प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही त्याची चांगली मदत होते.
 • आंब्यात व्हिटॉमिन A, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.

आंबे खाण्याचे तोटे (Disadvantages of eating Mango)

 • आंब्यात जवळपास 150 कॅलरीज असतात. जास्त कॅलरी खाल्ल्यास वजन वाढू शकते.
 • ज्या लोकांना संधिवात आहे अशा लोकांनी आंब्याचे सेवन कमी प्रमाणात करावे.
 • कच्ची कैरी किंवा आंब्याच्या अतिसेवनाने संधिवात आजार वाढू शकतो.
 • आंब्याचे अधिक सेवन केल्याने ब्लड शुगरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
 • आंब्याला पिकवण्यासाठीअनेकदा कॅल्शियम कार्बाइटचा मारा केला जातो. या केमिकलमुळे शरीराला मोठा धोका असतो.
 • आंबा हे गरम फळ आहे. त्यामुळे त्याच्या अधिक सेवनाने चेहऱ्यावर किंवा शरीरावरही मुरुम, पुरळ येऊ शकतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*