वेब-3 तंत्रज्ञान काय आहे ? | Web 3 in Marathi

आगामी काळात इंटरनेट जगतात web3 तंत्रज्ञान क्रांतिकारक ठरणार आहे. मात्र web-3 तंत्रज्ञान नेमकं काय आहे? त्याचा फायदा कसा होणार? यासंदर्भातील माहिती आपण जाणून घेऊयात.

वेब-3 नेमकं आहे तरी काय?

Web 3 इंटरनेट विकेंद्रीकरणाशी संबंधित तंत्रज्ञान आहे. युजरला आपल्या डेटावरील जास्त नियंत्रण मिळवून देणे असा त्यामागील उद्देश आहे. वेब-3 या शब्दाचा इथेरियमचे सहसंस्थापक गोविन वुड यांनी शोध लावला.

Web-3 ची गरज का पडली?

वेबसोबत डेटा म्हणून आपली माहिती जाते. कंपन्या या माहितीचा वापर करतात. हा डेटा तिसऱ्या पक्षालाही विक्री केला जातो. युजरला आपला डेटा कोठे गेला आहे? हे ठाऊक नसते. आता युजरला त्याच्या डेटाविषयीची माहिती मिळू शकते. म्हणूनच web 3 ची गरज भासली.

Web-3 चा फायदा कसा होणार?

Web 3 तंत्रज्ञानात माहिती सर्व्हरमध्ये साठवता येत नाही. ही माहिती व्हर्च्युअल डिजिटल वॉलेटमध्ये साठवली जाते. युजरला वॉलेटचा वापर वेब-3 अ‍ॅपच्या साईन इन करण्यासाठी करावा लागतो. हे तंत्रज्ञान ब्लॉकचेन तंत्रावर आधारित आहे. युजरला अ‍ॅपच्या बाहेर पडायचे असल्यास तशी व्यवस्था यामध्ये आहे. त्यासाठी त्याला केवळ लॉग ऑफ व वॉलेटला डिस्कनेक्ट करता येऊ शकेल.

दरम्यान, web 3 तंत्रज्ञानामुळे युजरच्या डेटावरील मालकी हक्क आता वाढणार आहे. यामुळे दिग्गज टेक कंपन्यांही याच्या वापरासाठी कमालीच्या उत्सुक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*