बदाम तेलाचे फायदे

बदाम खाण्याचे आरोग्य मेंदू आणि त्वचेलाही फायदे आहेत. बदमा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यसाठी फायदेशीर आहेत. बदामाचा वापर विविध पद्धतीने करता येतो. बदाम तेलाचे ही फायदे आहे.

Health benefits of almond oil.

चेहरा उजळतो:

रात्री झोपण्याआधी बदाम तेलाने चेहऱ्यावर मसाज केल्यास त्वचा तजेलदार बनते. डार्क सर्कल्स आणि चेहऱ्यावरील डागही कमी होतात. सुरकुत्या दूर होऊन, स्किन टाईट होते. चेहरा उजळतो.

केसांना पोषण:

बदाम तेलाने केसांचा रखरखीतपणा कमी होऊन, केस तमकदार बनतात. केसं तुटणं आणि गळण्याची समस्या असेल तर, बदाम तेलाचा वापर करावा. रात्री झोपताना बदाम तेलाने केसांच्या मुळांना मॉलिश करा. त्यामुळे केसचं नाहीत तर, मेंदूही तल्लख होईल.

थकवा दूर करते:

शरीरात थकवा असेल किंवा मसल्समध्ये वेदना असती तर, बदाम तेलाचा जरूर वापर करावा. या तेलाने दररोज मॉलिश केल्याने ज्या भागात वेदना आहेत त्या कमी होऊन, पोषणही मिळतं.

अरोमा थेरेपी:

बदाम तेलाचा वापर आरोमा थेरेपीसाठीही केला जातो. बदाम तेलाच्या वापराने शरीर रिलॅक्स होतं. तर, आरोमा थेरेपी नंतर झोपही चांगली येते. शिवाय शरीरातला थकवाही निघून जातो.

चांगल्या आरोग्यासाठी:

बदाम तेलाच्या सेवनाने किंवा दुधात मिसळून प्यायल्याने डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. पोटाच्या समस्येतून सुटका होते. डायबेटिज कंट्रोलमध्ये राहतो. त्याशिवाय शरीरात एलडीएल कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतो. यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी होऊन एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

You might also like
Leave a comment