लसूण खाण्याचे असेही फायदे…
आपल्या आहारातील अविभाज्य घटक असणाऱ्या लसणाचे अनेक गुणधर्म आहेत. तसेच त्यामुळे भाज्यांना वेगळी चव आणि वास येतो. आज आपण लसूण खाण्याचे काही विशेष फायदे पाहणार आहोत…
- बहिरेपणा, कुष्ठ – रोग, संधिवात, मुळव्याध, यकृताचे आणि पित्ताशयाचे विकार, डांग्या खोकला, रक्तदोष, घटसर्प या साऱ्या आजारांवर लसणाचा वापर केला जातो.
- अनेक वेळा लोकांना दमा किंवा श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर त्यावेळी सुद्धा लसणाचा वापर केला जातो.
- शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. कारण लसणात असणारे लोह रक्त तयार होण्यास आवश्यक असते.
- पचन विकार वाढवण्याची क्षमता ही लसणामध्ये जास्त प्रमाणात असते.
- सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे.
- लसणाच्या वापरामुळे कर्करोग या आजाराची भीती काही अंश कमी होते.
- लसणाचा काढा करून खाज येणाऱ्या भागात लावले तर लवकरात लवकर त्वचेच्या आजरापासून तुमची सुटका होते.