कोरोनामुक्त झाल्यानंतर तुमचा टूथब्रश तात्काळ बदला

सध्या देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. मात्र यामध्ये कोरोना मुक्त होणाऱ्यांचा आकडा देखील दिलासादायक आहे.
तर कोरोनामुक्त झाल्यानंतर देखील रुग्णांना आणखी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना मुक्त झाल्यानंतर तुमचा टूथब्रश तात्काळ बदला.
जर तुम्ही तोच ब्रश वापरत राहिलात तर दुसऱ्यांदा कोरोना संक्रमण होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच घरातील इतर सदस्यही संक्रमित होऊ शकतात.
लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे डेंटल सर्जरी विभागाचे डॉक्टर प्रवीण मेहरा यांनी देखील कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना तात्काळ आपला टूथब्रश बदलण्याचा सल्ला दिला आहे.