मधुमेही आणि पायाची काळजी |Diabetes Care Tips in Marathi
मधुमेही रुग्णांना पायाच्या समस्या साधारण नसतात. त्यामुळे होणारे परिणाम हे भयानक असू शकतात. जाणून घ्या कशी घ्यायची पायाची काळजी..
जर पायाची समस्या जाणवत असेल तर तातडीने उपचार घ्या. आहारातील साखर नियंत्रणात आणणे हा महत्त्वाचा उपाय आहे. मात्र त्याबरोबरच जखम होऊ नये यासाठी जास्त काळजी घ्या.
चालताना खरचटणे, ठेच लागणे यांसारख्या छोटय़ा समस्याही धोक्याच्या ठरू शकतात. मधुमेही रुग्णांनी घराबाहेर पडताना पादत्राणे घालून फिरावे.
चप्पल घातल्यानंतरही जखम होण्याची शक्यता असते. अशावेळी शूज फायदेशीर ठरतात.
पायांची स्वच्छता हा यातील महत्त्वाचा पैलू आहे. कोमट पाणी आणि साबणाचा वापर करून पायांची नियमित स्वच्छता करावी.
पाय धुतल्यानंतर कोरडे करून घ्यावे. बोटांमधील भागही कोरडा करा. यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने मलमाचा वापर करा.
नखे नियमित कापावी आणि नखांच्या कडा हळुवार घासून काढाव्या. नखे जास्त बारीक कापू नये. नखे कापण्यासाठी ब्लेडचा वापर करू नये. नेलकटरचाच उपयोग करावा. मात्र नखे कापताना जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.
पायांवर येणारे फोड, चट्टे, लालसरपणा किंवा नखांचे जंतुसंसर्ग यांसाठी दररोज पायांची तपासणी करावी.
मापाच्या आणि मऊ चपलांचा वापर करावा. रात्री झोपताना पातळ पायमोजे घालावेत.
पायाची नियमितपणे तपासणी करणे. पायाचा तळवा पाहण्यासाठी पायाखाली आरसा धरावा. पायाला जखम झाल्यास घरगुती उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.