पचनशक्ती वाढल्याने वजन नियंत्रणासाठीही मदत
अनेकदा आपल्याला वाटते की जास्त आहार हा वजन वाढण्यास कारणीभूत ठरतो मात्र जास्त आहार नाही तर पचनशक्तीचा दरावर वजन नियंत्रण अवलंबून असते.पचनशक्ती ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अन्नातील ऊर्जा गॅलरीमध्ये रूपांतरित होते आणि शरीराच्या इतर पेशी बनवण्यास मदत होते.पचनशक्ती मंद असल्यास मधुमेह आणि रक्तदाब देखील वाढतो. त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारणे अत्यंत गरजेचे असते.
पचनशक्ती वाढवण्यासाठी काही पुढील काही उपाय करता येतात :
- नियमित व्यायाम करुन स्नायू वाढल्याने कॅलरी बर्न होऊन पचनशक्तीला चालना मिळते.
- भरपूर पाणी प्या, यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी मदत होते.
- थोड्या थोड्या वेळाने खा, यामुळे कॅलरी बर्न होऊन पचनशक्ती वाढते.
- थोडे मसालेदार अन्न खाल्ल्याने पचनशक्ती वाढण्यास मदत होते मात्र जास्त प्रमाणात मसालेदार खाणे देखील हानिकारक ठरू शकते.
- ब्लॅक कॉफी पिल्याने पचनशक्ती चा दर वाढतो तसेच ग्रीन तेदेखील घेऊ शकता.
- पचनशक्ती वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज सात ते आठ तास अशी पुरेशी झोप घ्या.