सॅनिटायझर मुलांच्या या अवयवासाठी आहे धोकादायक

मास्क आणि हँड सॅनिटायझर हे तर आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भागच बनले आहेत. यासाठी लहान मुलांना सतत मास्क आणि हँड सॅनिटायझर वापरण्याची सवय लावायला हवी असे सांगितले जात आहे.

Hand Sanitizer for Childrens

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना सुद्धा या लाटेमध्ये अधिक धोका निर्माण झाला आहे. म्हणून आता लहान मुलांनी सतत मास्क वापरणे आणि हँड सॅनिटायझर वापरणे गेल्या वेळेपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले आहे.

परंतु काही महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या एका निरीक्षणात हे दिसून आले आहे की लहान मुलांसाठी हँड सॅनिटायझरचा वापर धोकादायक ठरू शकतो.

जानेवारी 2021 मध्ये JAMA Ophthalmology मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधना नुसार अल्‍कोहल-बेस्‍ड हँड सॅनिटायझरचा जास्त वापर केल्याने लहान मुलांमध्ये डोळ्यांशी निगडीत समस्या आणि विकार वाढू शकतात.

याशिवाय फ्रेंच पॉइजन कंट्रोल सेंटरचा हा दावा आहे की 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हानिकारक केमिकल मुळे डोळ्यांना होणारा धोका मागच्या वर्षीपेक्षा सात पट वाढला आहे.

लहान मुलांसाठी सॅनिटायझर कसा वापर करावा?

यासाठी तुम्ही काही पद्धती वापरू शकता. जर तुमचे मुल लहान असेल तर त्याच्या हातात हँड सॅनिटायझर तुम्हीच द्या आणि तुमच्या समोरच ते वापरायला सांगा.

सार्वजनिक भागात ऑटोमेटिक हँड सॅनिटायझर मशीन असतात, त्याचा वापर देखील मुलांना तुमच्या समोरच करायला लावा.

शक्य असल्यास हँड सॅनिटायझरच्या जागी हँड वॉश करावेत.

जर तुमच्या मुलाचे डोळे पहिल्यापासून कमजोर असतील तर त्याला चष्मा घाला. यामुळे डोळ्यांपर्यंत केमिकल पोहोचणार नाहीत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*