दिवाळी आणि पाळावयाची पथ्ये
दिवाळी हा आनंदाचा सण. मात्र दिवाळीत आनंदावर विरजण येईल असे काही आरोग्यसोबत करू नका. कारण फराळामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. अशात खालील काही पथ्ये तुम्हाला फायदेशीर ठरतील.
- फराळ आहे त्याने काय होतंय असं म्हणतं, एकदम जास्त पदार्थ खाऊ नये.
- शक्यतो सकाळी लवकर फराळ करावा. जर फराळ जास्त झाल्ल्यास, दुपारी आणि रात्री भुकेपेक्षा कमी खावे.
- डाळीचे पदार्थ उदा. बेसन लाडू, चकल्या खाण्यात आल्यास भरपूर पाणी प्यावे.
- जास्त खाल्ल्याने पोट फुगल्यासारखे किंवा घट्ट झाल्यास, ताज्या फळांचा रस, (विशेषतः संत्री, मोसंबी) घ्यावा.
- छातीत किंवा पोटात जळजळ वाटल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा खायचा सोडा घालून प्यावा.
- फराळाच्या अतिसेवनाने उलट्या झाल्यास, त्यानंतर लंघन करावे. खाण्याचा सोडा घालून लिंबू सरबत देखील पिऊ शकता.
- जुलाब झाल्यास पुढचे दोन दिवस खाणे कमी खावे, पाणी जास्त प्यावे, दिवसातून दोन वेळा एक केळे खावे.
- पहाटे एक-दोन ग्लास कोमट पाणी प्यावे.
- सकाळच्या व्यायामाचे वेळापत्रक शक्यतो बदलू नये. बाहेर जाणे शक्य नसेल तर किमान १५ ते २० मिनिटे चालावे. योगासने, सूर्यनमस्कार नेमाने करावेत.
- व्यायाम करत नसाल, तर दिवाळीच्या मुहूर्तावर व्यायाम सुरू करावा.
- जर बाहेरून मिठाई घेत असाल तर खात्रीशीर दुकानातून घ्या. मिठाई गाईच्या तुपात बनवावी. कारण ते आरोग्यासाठी हितकर मानले जाते.
- बाहेरून खरेदी केलेल्या दुधाच्या मिठाईपेक्षा घरी बनवलेले बेसनाचे, खव्याचे, डिंकाचे किंवा रव्याचे लाडू आणि मिठाईला प्राधान्य द्या.
- दिवाळीमध्ये दोन्ही वेळेचे जेवण हलके घ्या. तळलेले पदार्थ, खीर, पुरणपोळी यासारखे पदार्थ किमान एक वेळच्या जेवणात समाविष्ट करा.
- दिवाळीत जर रात्री उशिरापर्यंत जागरण होणार असेल तर अधेमधे 4 ते 5 काजू किंवा बदाम खा. झोपताना न विसरता 1 ग्लास कोमटपाणी पिऊन झोपा.
- दिवाळीमध्ये कॅलरीज कमी करण्याच्या नादात ‘शुगर फ्री’ मिठाई किंवा ‘फॅट फ्री’च्या आहारी जाऊ नका.