अशा पद्धतीने इतरांची दिवाळी आनंदी करा

कोरोनामुळे यंदाची दिवाळी ही खूपच वेगळी असणार आहे. अनेकांच्या हाताला काम नाही. हातात पैसे नाही. त्यामुळे आपण यंदाची दिवाळी व्यर्थ खर्च करण्यापेक्षा काही गोष्टी दान करून इतरांची दिवाळी देखील खास बनवू शकतो.

या दिवाळीत फक्त आपल्या मित्रांसोबत पार्टी करु नका, फक्त फटाके फोडू नका. त्याऐवजी, आणखी काहीतरी वेगळे करा, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकासाठी दिवाळी खास बनविण्यात मदत करू शकतो.

गरिबांची दिवाळी करू शकता गोड

यंदा अनेकांची दिवाळी ही साधेपणाने साजरी होणार आहे. कोरोनाचा प्रभाव आजही सर्वत्र दिसून येत आहे. त्यातल्या त्यात आपण आपल्या अनावश्यक गोष्टी टाळून दुसऱ्यांची दिवाळी काही प्रमाणात गॉड करू शकतो. आपल्या कुवतीनुसार परिसरातील आपल्या वृध्द, निराधार, अनाथांना दिवाळीसाठी कपडे, किराणा, मिठाई देऊन त्यांची दिवाळी गोड करू शकतो.

या दिवाळीमध्ये सांता व्हा

अनाथ मुलांसाठी सांता व्हा. आपल्याकडे अशा बऱ्याच वस्तू अशा असतात ज्यांची आपणास गरज नसते, मात्र इतर कोणाला तरी आवश्यकता असते. अशा वस्तू आपल्या घरामध्ये ठेऊन नुसत्या पडून राहण्यापेक्षा ज्याला त्या वस्तूची गरज आहे, त्यांना देऊन त्यांची दिवाळी आपण खास करू शकतो. त्यांना ग्रीटिंग कार्ड किंवा चॉकलेट द्या.

मिठाई/ चॉकलेटचे वाटप करा

दिवाळीनिमित्त आपल्या घरी बरेच पाहुणे मंडळी येत असतात, येताना ते बरोबर चॉकलेट, मिठाई घेऊनच येतात. बहुदा या मिठाईकडे कोणाचे लक्षही जात नाही किंवा ते तसेच पडून खराब होतात. ते वाया घालवणे किंवा फेकून देण्याऐवजी आपण वंचित लोकांसाठी जे जे रस्त्यावर राहतात त्यांना भेट देऊन त्यांची दिवाळी खास बनवू शकतो.

संवाद साधा/ पत्रे लिहिणे

जगभरातील लोकांशी संपर्क साधा, विशेषत: ज्या लोकांना कोणी नाही, ज्यांची काळजी घ्यायला कोणी नाही अशा लोकांशी संपर्क साधा, त्यांना पत्र लिहा.

स्वयंसेवी संस्थांना देणगी द्या

किमान एक व्यक्ती किंवा कदाचित मुलाचे भविष्य सुरक्षित करा. त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य द्या, त्यांना वाढण्यास मदत करा. लक्षात ठेवा आनंद आपल्या स्वतःच्या कृतीतून येतो. यापेक्षा अधिक समृद्ध, फायद्याचे आणि परिपूर्ण काहीही असू शकत नाही.

एखाद्या अनाथाश्रमात वेळ घालवा

एखाद्या अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात वेळ घालवल्यास ज्यांना कोणी नाही त्यांना आपले कोणीतरी आहे, किंवा आपण एकटे असल्याची भावना त्यांच्या मनी येणार नाही. त्यांच्यासाठी एक सुंदर रांगोळी आणि एक मिष्टान्न तयार करुन त्यांना भरवू शकता. त्यांच्यासोबत एखादा खेळ खेळून आनंद देण्याचा प्रयत्न करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*