शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर | शेंगदाणा खाण्याचे फायदे
आजच्या काळात निरोगी शरीस हीच खरी संपत्ती असल्याचे दिसून आले आहे. शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊ या शेंगदाण्याच्या फायद्यां बद्दल.
कॅन्सरपासून संरक्षण
शेंगदाण्यामध्ये पॉलीफेनोलिक नावाचा अँटीऑक्सिडेंट आढळतो. त्याच्या सेवनाने पोटाच्या कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.
मधुमेहाला नियंत्रित करते
शेंगदाणे खाल्ल्याने मधुमेह होण्याची शक्यता कमी होते. दररोज आपल्या आहारात याचे सेवन करावे.जेणे करून जीवघेण्या आजारापासून बचाव होऊ शकेल.
व्हिटॅमिन डी व कॅल्शियमचा स्रोत
शेंगदाण्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. शेंगदाण्यातील पोषक घटकांपासून शरीराला व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम मिळतं.
हार्मोन्सला कंट्रोल करते
जेव्हा स्त्रिया आणि पुरुषांमध्ये हार्मोन्स असंतुलित होतात, तेव्हा अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवतात. म्हणून पुरुष आणि स्त्रियांनी दररोज मूठभर शेंगदाणे खावे.