जास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम

आपण खाण्या-पिण्यात जास्त साखर घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आज आम्ही देणार आहोत…

साखरेचे अधिक सेवन आजाराला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकते.

साखरेच्या अधिक सेवन केल्याने शरीरात लिपोप्रोटीन लिपॉज तयार होतो. यामुळे शरीरावर चरबी जमा होते, आणि लठ्ठपणा वाढतो.

साखर जास्त प्रमाणात घेतल्याने याचा थेट परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर होतो आणि प्रतिकारक शक्ती कमकुवत होते.

जास्त प्रमाणात साखर घेतल्याने आपल्या लिव्हरचे काम वाढते. आणि शरीरात लिपिडचे निर्माण जास्त होते.अशा परिस्थितीत फॅटी लिव्हर रोगासारख्या समस्या होण्याचा धोका वाढतो.

जास्त प्रमाणात साखर घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. जी मेंदूसाठी नुकसानदायक आहे. यामुळे स्मृतीभंश देखील होऊ शकतो.

साखरेचे जास्त प्रमाण घेतल्यावर हृदय विकाराचा झटका किंवा हार्ट स्ट्रोक सारखे त्रास देखील होऊ शकतात.

You might also like
Leave a comment