जाणून घ्या दररोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे

दही आवडत नाही असे लोक तुरळक आढळतात. तर दही हा प्रत्येक घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे. दह्यामध्ये अनेक पौष्टिक तत्वे असतात.

दह्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने, लॅक्टोज सारखे रासायनिक पदार्थ भरपूर प्रमाणात आढळतात. यामुळे उन्हाळ्यात शरीराला फायदेशीर ठरते.

दह्यामध्ये लो फॅट असल्याने वजन कमी करण्यासाठी दही उपयोगी ठरते. तसेच दह्यामध्ये उच्च प्रथिने असल्याने शरीराचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

दह्यामध्ये प्रोबायोटिक्स पोषक तत्वे असतात यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. त्यामुळे ज्यांना दूध आवडत नाही त्यांनी दही खाल्ल्यास दुधाची कमतरता देखील भरून निघते.

दह्यामुळे पोट साफ राहते, त्यामुळे दिवसभर पचन क्रिया निरोगी ठेवते. दररोज एक वाटी दही खाणे आरोग्यास लाभदायक ठरते. तसेच गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होते.

दह्यामध्ये पर्याप्त प्रमाणात पोटॅशियम असते, जे रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त मानले जाते. ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो ते दही खाऊ शकतात.

दही पुरुषांमध्ये वीर्य गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. याशिवाय दहीमुळे पुरुषांचे आरोग्यही बळकट होते. त्यामुळे पुरुषांना दहीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. दह्याच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते त्यामुळे थकवा दूर होऊन तणाव कमी होण्यास मदत होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*