पित्त वारंवार खवळतंय? ‘हे’ ट्राय करा
आजकाल अगदी लहानमुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत कोणालाही पित्त किवा अॅसिडीटी होताना दिसते. खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयी आणि वेळा तसेच मानसिक ताणात होत असलेली वाढ यामुळे पित्ताचे विकारही वाढले आहेत.
पित्तावर आजकाल बाजारात अनेक अँडासिड गोळ्या उपलब्ध आहेत. मात्र त्याच्या ऐवजी घरच्याघरीच काही रोजच्या वापरातले पदार्थ वापरूनही त्यावर नियंत्रण मिळविता येते. त्यावर एक नजर…
घरगुती उपचारात 1/4 चमचा ज्येष्ठमध पावडर दूध अथवा पाण्यातून दिवसातून दोन वेळा तीन दिवस घेण्याने पित्ताचा त्रास कमी होतो. अमसूल सरबत प्यायल्याने ही पित्त कमी होते.
गार वारे लागल्यामूळे अंगावर येणार्या पित्ताला शैतपित्त म्हणतात. या पित्तावर खायचा सोडा कोरडाच अंगाला लावून अर्ध्या तासाने आंघोळ करावी म्हणजे हा त्रास कमी होतो.
पित्त कमी करण्यासाठी गार केलेले दूध भरपूर साखर घालून थोडे थोडे वारंवार प्यायल्यास पित्तामुळे पोटात अथवा छातीत होणारी जळजळ कमी होते. दूध गार करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवले तरी चालते.
बाजारात सूतशेखर मात्रा मिळते. पित्तावर ही मात्रा उगाळून दुधातून घेतल्यासही आराम मिळतो. पित्तामुळे होणार्या उलट्या थांबविण्यासाठी दूध आणि घरातील फ्रिजमध्ये तयार केलेला चांगल्या पाण्याचा बर्फ एकत्र करून प्यायल्यास उलट्या कमी होतात.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.