गर्भवती आई आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी टिप्स
गर्भाववस्थेत बर्याच वेळा तणाव, चिंता यासारख्या समस्यांना स्त्रीला सामोरे जावे लागते आणि त्यातच ती नकारात्मक विचारांनी वेढली जाते. या समस्यांचा परिणाम तिच्या गर्भावरही होतो. अशा परिस्थितीत खालील टिप्स तुम्हाला मदत करतील…
योग आणि ध्यान
योग, ध्यान आणि डॉक्टर-निर्देशित व्यायाम नियमितपणे करा. एखाद्या प्रशिक्षकाच्या उपस्थितीत योगा केल्यास अधिक फायदा होईल. याशिवाय नकारात्मक बोलणाऱ्यांपासून अंतर ठेवा.
एखादी डायरी लिहा
यामुळे आपण आपल्या आत सुरु असलेल्या सर्व गोष्टी व्यक्त करण्यास सक्षम व्हाल आणि यामुळे आपला ताणतणाव देखील कमी होईल.
ऐका संगीत
या काळात मनाला शांती देणारी आणि आवडती गाणी ऐका. संगीत स्वतः एक उत्तम थेरपी म्हणून काम करते. या व्यतिरिक्त याकाळात आवडते छंद जोपासा.
मॉर्निंग सिकनेस टाळण्यासाठी
यासाठी घाई न करता सकाळी आरामात उठा. हलके कोमट पाणी प्या. तळलेले, मसालेदार अन्न खाणे टाळा. चहा कॉफी सेवन देखील कमी प्रमाणात करा. रिक्त पोटी राहू नका.
निरोगी व सक्रिय बाळासाठी
गरोदरपणात सक्रिय रहा, कथा ऐका, धार्मिक पुस्तके मोठ्याने वाचा, हलक्या पावलांनी चाला आणि व्यायाम करा. यामुळे शरीरात इंडोरफिन संप्रेरक तयार होते, यामुळे आपण नेहमी आनंदी राहाल आणि हा हार्मोन प्लेसेंटामधून गर्भातील बाळाकडे जाईल.