अन्न पचवण्यासाठी ‘या’ पद्धतींचे अनुसरण ठरेल फायदेशीर

हिवाळ्याच्या हंगामात विविध प्रकारचे पदार्थ खाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. परंतु आळशीपणामुळे पुरेशा व्यायाम आपल्याकडून होत नाही. ज्यामुळे अन्न पचन नीट होत नाही आणि आपल्याला बर्‍याच लहान-मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. असे होऊ नये म्हणून खाली गोष्टी तुम्हाला मदत कार्तिकला.

हिंग

यात असणारे अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म अपचन, खराब पोट आणि गॅससारख्या समस्यांवर मात करण्यास मदत करतात.

दही

पोटात उष्णता किंवा जळजळ झाल्यास, दही किवा दहीने बनवलेल्या लस्सीचे सेवन केल्याने आराम मिळतो. इतकेच नाही तर, दह्यापासून बनवलेले ताक दररोज सेवन केल्यास अन्न लवकर पचते.

आले

यात 25 भिन्न अँटिऑक्सिडेंटची वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ते शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अत्यंत फायदेशीर आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणात आले समाविष्ट करू शकता. याने तुमची पचनशक्तीही सुधारते.

बडीशेप-ओवा चूर्ण

जेवणानंतर नियमितपणे बडीशेप आणि ओवा पूड खा. हे चूर्ण खाल्ल्याने अन्न लवकर पचते आणि पोटासंबंधित समस्या उद्भवत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*