
मुका मार लागणे घरगुती उपायमुका मार म्हणजे त्वचेच्या आतील दुखापत होय. यावेळी त्वचेच्या आतील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. यामुळे अनेकदा मार लागलेला भाग थोडा काळसर पडतो.
मुका मार घरगुती प्रथमोपचार
- मुका मार लागल्यानंतर त्यावर बर्फ लावा.
- कोरफडीत अँटि इन्फ्लेमेटरी घटक असतात. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
- कोरफडीचा गर थेट जखमेवर लावल्यानं जखम बरी होण्याची प्रक्रिया जलद होते. तसंच रक्ताच्या गुठळ्याही होत नाहीत.
- अननसामध्ये ब्रोमेलेन हा एन्झाइम्स आणि अँटि-इन्फ्लेमेटरी असा घटक असतो. यामुळे मुका मार बरा होण्यास आणि सूज कमी होण्यास मदत होते.
दरम्यान तुमची जखम कधी बरी होणार हे तुमच्या आहारावरही अवलंबून आहे. अशात तुमच्या आहारात संत्री, लिंबू अशी आंबट फळं, पालक, ब्रोकोली, लेट्युस, सोयाबीन, स्ट्रॉबेरीज अशी व्हिटॅमिन के युक्त भाज्या-फळे, सफरचंद, कांदा, चेरी, हिरव्या पालेभाज्या आणि मासे अशा प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
..
Leave a Reply