दातदुखी आणि कानदुखीवर ‘ओवा’ ठरतो गुणकारी

निसर्गामध्ये अनेक गुणकारी पदार्थांचा वापर मसाला बनविण्यासाठी केला जातो. तसेच यामधील काही पदार्थांचा नैसर्गिक औषध म्हणून वापर केला जातो.

‘ओवा’ हा देखील औषध म्हणून वापरला जातो. ओव्याच्या वापराने दातदुखी आणि कानदुखी बरी होऊ शकते, ते आपण पाहू.

दातदुखी

दात दुखणे अथवा हिरड्या सुजण्याची समस्या निर्माण होते. यांसारख्या त्रासदायक वेदना होत असल्यास ओव्याच्या पाण्याच्या गुळण्या केल्यास आराम मिळतो.

दात दुखत असल्यास ओव्याचे तेल कापसाच्या बोळ्याने दातांवर लावावे अथवा त्या दाताच्या हिरडीला ओव्याच्या तेलाने मसाज करावा.

कानदुखी

कान दुखत असल्यास ओव्याचे तेलाचे काही थेंब कानात घालावे. ज्यामुळे कानात जे ठणके मारत असतात ते कमी होते.

मायग्रेन

ओवा गरम करून त्याचा वास घेतल्याने अथवा ओव्याचा लेप डोक्यावर लावल्यामुळे मायग्रेनच्या त्रासापासून आराम मिळू शकतो.

सांधेदुखी

सांधेदुखी अथवा पाठदुखी होत असल्यास ओवा गरम करून तो एका कपड्यात बांधावा आणि त्याचा दुख-या भागावर शेक घ्यावा. आराम मिळेल.

You might also like
Leave a comment