पुदिन्याच्या सेवनाने रोगांवर होईल मात
पुदीना ही वनस्पती सर्वानाच माहिती आहे. ही एक आयुर्वेदिक आणि सर्वत्र उपलब्ध होणारी वनस्पती आहे.
यामध्ये मेंथॉल, प्रथिने, चरबी, कर्बोदक, व्हिटॅमिन-ए, राइबोफ्लेविन, तांबे, लोह इ. असतात.
- पुदीना शरीरातून कफ देखील काढून टाकते. उबदार गुणधर्मामुळे, तो शरीरामधून घाम काढून ताप नियंत्रणात ठेवतो.
- पुदिना हे पोटाच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे म्हटले जाते.
- एक चमचा पुदिन्याच्या रसात एक कप कोमट पाणी आणि एक चमचा मध मिसळल्यास आणि पिल्यास पोटाच्या आजारांमध्ये आराम मिळतो.
- पुदिन्याचा वापर उलट्या थांबविण्यासाठी फायदेशीर ठरतो. यासाठी पुदीनाच्या पानांमध्ये 2 थेंब मध मिसळून प्यावे.