या कारणामुळे दात होतात पिवळे, वेळीच व्हा सावध
माणसाचे दात हे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. दात पांढरे करण्यासाठी अनेक उत्पादने विक्रीस आहे परंतु दातांना पिवळेपणा का येतो ? याचा कधी आपण विचार केला आहे का ? योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अचानक दात पिवळे होतात आणि यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर देखील फरक पडतो
दातांना पिवळेपणा नेमका का येतो?
- सर्वप्रथम हि समस्या अनुवंशिक देखील असू शकते, कारण घरातील पूर्वजांचे दात पिवळे असतील तर आपले देखील दात पिवळे होऊ शकतात. दातावरील बाह्य स्तर पातळ असेल तर दाताचा पिवळेपणा दिसतो.
- वयानुसार दाताचा इनॅमलचा स्तर हा पातळ होतो त्यामुळे देखील दातांना पिवळेपणा येऊ शकतो. वय देखील दाताकरता एक महत्वाचा मुद्दा आहे.
- कॉफी, चहा, तंबाखु इत्यादी गोष्टीमुळे देखील दातांना पिवळेपणा येतो, त्यामुळे दिवसातून दोनदा घासणे आवश्यक आहे. दातावर कीड जमा झाल्याने देखील दात पिवळे होऊ शकतात.
- दातांमध्ये चांदी भरल्याने देखील दात पिवळे पडतात. केमोथेरपी मध्ये देखील दात पिवळे पडतात. तसेच गर्भवती स्त्रीला आजार किंवा संसर्ग झाल्यास बाळाच्या दातावर त्याचा कालांतराने परिणाम जाणवतो.
- अन्नपदार्थ देखील दात पिवळे होण्यास कारणीभूत ठरू शकतात. चहा, कॉफी, कोला, चेरी, ब्लुबेरी, सफरचंद आणि बटाटे खाल्ल्याने देखील दात पिवळे होतात. या पदार्थामुळे दातावरील इनॅमल स्तर कमी होतो.
- पाण्यामधून फ्लोराईड हा घटक नेहमी शरीरात गेल्यास दात पिवळे होतात. लहान मुलांनी टुथपेस्ट किंवा फ्लोराईडयुक्त पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यास दात पिवळे होतात.
टीप – या माहीतीच्या आधारे तुम्हाला अंदाज येईल दातांची वेळीच स्वच्छता ठेवणं आणि काळजी घेणं किती महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण दातांच्या समस्यांचं निदान करून आरोग्य तज्ज्ञांकडून योग्य तो सल्ला घेऊनच उपचार करा.