या कारणामुळे दात होतात पिवळे, वेळीच व्हा सावध

माणसाचे दात हे त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. दात पांढरे करण्यासाठी अनेक उत्पादने विक्रीस आहे परंतु दातांना पिवळेपणा का येतो ? याचा कधी आपण विचार केला आहे का ? योग्य ती काळजी न घेतल्यामुळे अचानक दात पिवळे होतात आणि यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर देखील फरक पडतो

दातांना पिवळेपणा नेमका का येतो?

  • सर्वप्रथम हि समस्या अनुवंशिक देखील असू शकते, कारण घरातील पूर्वजांचे दात पिवळे असतील तर आपले देखील दात पिवळे होऊ शकतात. दातावरील बाह्य स्तर पातळ असेल तर दाताचा पिवळेपणा दिसतो.
  • वयानुसार दाताचा इनॅमलचा स्तर हा पातळ होतो त्यामुळे देखील दातांना पिवळेपणा येऊ शकतो. वय देखील दाताकरता एक महत्वाचा मुद्दा आहे.
  • कॉफी, चहा, तंबाखु इत्यादी गोष्टीमुळे देखील दातांना पिवळेपणा येतो, त्यामुळे दिवसातून दोनदा घासणे आवश्यक आहे. दातावर कीड जमा झाल्याने देखील दात पिवळे होऊ शकतात.
  • दातांमध्ये चांदी भरल्याने देखील दात पिवळे पडतात. केमोथेरपी मध्ये देखील दात पिवळे पडतात. तसेच गर्भवती स्त्रीला आजार किंवा संसर्ग झाल्यास बाळाच्या दातावर त्याचा कालांतराने परिणाम जाणवतो.
  • अन्नपदार्थ देखील दात पिवळे होण्यास कारणीभूत ठरू शकतात. चहा, कॉफी, कोला, चेरी, ब्लुबेरी, सफरचंद आणि बटाटे खाल्ल्याने देखील दात पिवळे होतात. या पदार्थामुळे दातावरील इनॅमल स्तर कमी होतो.
  • पाण्यामधून फ्लोराईड हा घटक नेहमी शरीरात गेल्यास दात पिवळे होतात. लहान मुलांनी टुथपेस्ट किंवा फ्लोराईडयुक्त पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्यास दात पिवळे होतात.

टीप – या माहीतीच्या आधारे तुम्हाला अंदाज येईल दातांची वेळीच स्वच्छता ठेवणं आणि काळजी घेणं किती महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण दातांच्या समस्यांचं निदान करून आरोग्य तज्ज्ञांकडून योग्य तो सल्ला घेऊनच उपचार करा.

You might also like