ई – पास कसा काढायचा ? जाणून घ्या सविस्तर | e Pass process in Narathi

राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच प्रवासावर निर्बंध घातले असून जिल्हाबंदीही लागू केली आहे.

आता प्रवास करायचा असेल तर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास काढावा लागेल.

जाणून घ्या ई – पाससाठी अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना

शासकीय कर्मचारी/ वैदयकीय सेवेतील कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्याना केवळ त्यांचे कार्यालयीन कामकाजाच्या प्रवास करण्याकरिता आंतरजिल्हा किंवा आंतर-शहर जाण्यासाठी ई-पासची आवश्यकता नाही.

मुंबई शहरांतर्गत तातडीच्या आणि अत्यावश्यक कारणांकरिता प्रवासासाठी e Passची आवश्यकता नाही. सध्या कार्यान्वित असलेली कलर कोड पद्धती या पुढेही तशीच वापरात राहील.

21 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार अन्य खासगी व्यक्तींना अत्यंत तातडीच्या अणि अत्यावश्यक कारणांस्तव बुहन्मुंबई शहराबाहेर अथवा आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास प्राप्त करणे बंधनकारक असेल.

पास मंजूर करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार केवळ मुंबई पोलीस आयुक्‍तालयातील संबंधित परिमंडळीय पोलीस उपआयुक्त कार्यालयाकडे आहे.

सर्व तपशील योग्यरित्या भरा आणि सबमिट बटणवर क्लिक करा. अपलोड करताना सर्व संबंधित कागदपत्रे एका फाईलमध्ये एकत्र करा.

फोटोची साईड 200 KB पेक्षा जास्त नसावी आणि संबंधित दस्तऐवजाची साईड 1 MB पेक्षा जास्त नसावी.

अर्ज सबमिट केल्यानतर, आपल्याला एक टोकन आयडी मिळेल. ते जतन करा आणि आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी त्याचा वापर करा.

सबंधित विभागाकडून अर्ज पडताळणी व मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही नमूद टोकन आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता.

ई-पासमध्ये आपले वाहन क्रमांक, ई-पासची वैधता आणि क्यूआर कोड असा तपशील असेल.

प्रवास करताना आपल्याकडे ई-पासची सॉफ्ट कॉपी / हार्ड कॉपी सोबत ठेवा आणि पोलीसांनी विचारले असता आपला ई-पास दाखवा. आपण पास प्रिंट करून त्यास आपल्या वाहनावर चिकटवू शकता.

ई-पासची नक्कल प्रत बनवणे/ वैध तारखेनंतर अथवा अधिकृत परवानगीशिवाय त्याचा वापर करणे किंवा त्याचा दुरुपयोग करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*