तुम्ही कोरोना लस घेतलीय मग अशी घ्या काळजी

गंभीर, एकापेक्षा अधिक आजार, मधुमेह, उच्च रक्‍तदाब आहे. तसेच ॲलर्जीचा त्रास होणाऱ्या व्यक्‍तींनी वैद्यकीय सल्ला आणि प्रमाणपत्राशिवाय कोरोना लस दिली जाऊ नये.

लस घेण्यापूर्वी किमान आठवडाभर अगोदर अतिरिक्‍त मद्यपान करू नये, ताप किंवा अंगदुखीच्या गोळ्या खाऊ नये, मानसिक दडपण घेऊ नये.

पहिली लस घेतल्यावर १४ दिवसांनी त्याचे परिणाम दिसतात. दुसरी लस सहा ते आठ आठवड्यांनी घ्यावी. दोन्ही डोसनंतर ३० दिवसांनी ९५ टक्‍क्‍यांपर्यंत प्रतिकारशक्‍ती वाढते.

लसीकरणानंतर दोन दिवसांत सर्व नॉर्मल होते. विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, लस घेतल्यावर मोठा प्रवास, अवजड कामे काही दिवस टाळा.

काही काळ ताप येणे, अंगदुखी ॲलर्जीने अंगावर पुरळ उठण्याची शक्‍यता दंड दुखणे, इंजेक्‍शनची जागा लाल झाली तरी काळजी नाही.

लसीकरणानंतर कमीत कमी ४५ दिवस मद्यपान आणि धूम्रपान टाळा. हा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

लस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास देखील मृत्यू वा रुग्ण गंभीर होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. त्यामुळे लस घ्या, नियम पाळा आणि बिनधास्त राहा, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*