भारतीय सनदी सेवांचे प्रकार

भारतात सनदी सेवांचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

अखिल भारतीय सेवा

भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय वन सेवा (IFS) यांचा यात समावेश होतो.

केंद्रीय सेवा

या केंद्रशासनाच्या अखत्यारीतील असतात. भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय महसूल सेवा (IRS) इत्यादींचा त्यात समावेश असतो.

राज्यसेवा

या राज्यशासनाच्या अखत्यारीत असतात. उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी स्पर्धापरीक्षांमधून निवडले जातात. गुणवत्ता व कार्यक्षमता या निकषांच्या आधारे सनदी सेवकांची निवड व्हावी म्हणून भारतीय संविधानाने लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडते व त्यांची नेमणूक शासन करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारा उमेदवार निवडते व त्यांच्या नेमणुकीची शिफारस शासनाला करते.

नोकरशाही आणि सनदी सेवांमधूनही समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीयांना आणि दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवांमध्ये येण्याची संधी दिली आहे. सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक सनदी सेवेतील संधींपासून वंचित राहून नयेत म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*