काळ्या मिरीचे औषधी गुणधर्म | Medicinal properties of Black Pepper (Kali Mirch)

आपल्या घरातल्या मसाल्याच्या डब्यातील प्रत्ये मसाला किंवा मसाल्याचा पदार्थ हा आरोग्यासाठी औषध म्हणून उपयुक्त असतो. आपल्या जेवणामध्ये मिर्‍यांचा वापर तिखटाला पर्याय म्हणून केला जातो. परंतु काळ्या मिरीचे औषधी गुणधर्म व्यापक आहेत. त्यावर एक नजर

  • थंडीच्या दिवसात होणारा फ्ल्यू काळ्या मिर्‍याचा काढा प्यायल्याने दुरूस्त होतो.
  • थंडीमुळे छाती भरून येते अशा वेळी क जीवनसत्त्वाचा अंतर्भाव असलेले काळे मिरे औषधी म्हणून फार गुणकारी ठरतात.
  • काळे मिरे हे कर्करोग प्रतिबंधक समजले जातात.
  • काळे मिरे त्वचेसाठी चांगले समजले जातात.
  • संधीवाताच्या काही प्रकारांमध्ये जेव्हा सांध्यांचा दाह होतो तेव्हा काळे मिरे हा दाह कमी करतात.
  • विशेषतः गुडघ्यातील दाह काळ्या मिर्‍यांनी कमी होतो.
  • काळे मिरे अन्नपचनासही उपयुक्त मानले जातात.
You might also like
Leave a comment