दिवाळीची साफसफाई करताना या टिप्स लक्षात ठेवा

सगळे घर एकत्र स्वच्छ करायचं ठरवलं, तर तुमच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. घरातील अनावश्यक गोष्टी काढून टाका.

जुने कपडे, चपला, भांडी यांसारख्या वापरात नसलेल्या परंतु चांगल्या असलेल्या वस्तू एखाद्या सामाजिक संस्थेला किंवा गरीबांना द्या.

आता आवरण्यासाठी पसारा कमी होईल. मग तुमचा वेळ आधी लादी, भांडी यांच्या साफसफाईत वाटून घ्या.

घरातील कपाटामागील किंवा इतर वस्तूंमागील धूळ आधी झाडूने साफ करा. मगच ओल्या फडक्याने पुसून घ्या.

घरातील पडदे दिवाळीच्या वेळी हे धुवायला काढताना जास्त वेळ साबणाच्या पाण्यात भिजवून ठेवल्याने त्यामधील मळ लवकर सुटून येण्यास मदत होते.

तांबे, पितळाची भांडी घासण्यासाठी, काळपटपणा निघण्यासाठी लिंबाच्या सालीचा किंवा चणाडाळीचा वापर करू शकता.

पंख्याची साफसफाई करताना जुन्या उशीच्या कव्हरचा वापर करू शकता. खुर्चीवर काळजीपूर्वक उभं राहून पंख्यांच्या पात्यावरील धूळ काढून घ्या.

बेकिंग सोडा, गरम पाणी किंवा कोलगेटचा वापर करून ब्रशने टाईल्स स्वच्छ करू शकता.

नव्या प्रकारचे स्प्रे मॉप्स हातात सहज धरता येण्यासारखे असतात म्हणून लादी न वाकता चकचकीत स्वच्छ करता येईल.

स्वयंपाकघरातील सिंक किंवा यासारखी एखादी बंद जागा असेल तर त्याठिकाणी कुबटपणा राहण्याची शक्यता असते. अशावेळी तिथे डांबरगोळ्या किंवा कापूर ठेवावा.

You might also like
Leave a comment