
जर तुम्ही कागदापासून बनविलेल्या कपमध्ये चहा पित असाल तर, तुमची एक चूक तुमच्या आरोग्यसाठी हानिकारक ठरू शकते.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जर एखादी व्यक्ती पेपर कपमध्ये दिवसातून तीन वेळा चहा पित असेल तर, त्याच्या शहरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण जातात. जे आपल्या शरीरासाठी घातक आहे.
संशोधनात काय दिसून आले?
- हे कप तयार करण्यासाठी हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर बसविला जातो, जो प्रामुख्याने प्लास्टिकचा बनलेला असतो.
- याच्या मदतीने कपमधील द्रव पदार्थ टिकून राहते. यात गरम पाणी टाकल्यानंतर 15 मिनिटांत हा थर वितळण्यास सुरुवात होते.
- एका कपमध्ये 15 मिनिटांसाठी 100 मि.ली. गरम द्रव ठेवल्यास त्यात 25,000 सूक्ष्म-आकाराचे प्लास्टिकचे कण वितळवते..याचा अर्थ दररोज तीन कप चहा किंवा कॉफी पिणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्म कण जातात.
Leave a Reply