बियाण्यांच्या बँकर… पद्मश्री राहीबाई पोपरे

विविध फळ भाज्या, फुलभाज्या, आणि औषधीं बियाणांचे जतन करून त्यांची सिडबँक करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील पोपरेवाडीतील पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या विशेष कार्याबद्दल आज महिलादिनी जाणून घेऊयात.

▪️ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पोपरेवाडी येथील रहिवासी महिला शेतकरी राहीबाई पोपेरे मागील 30 वर्षांपासून पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक आणि संवर्धन करीत आहेत.

▪️ बायफ इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने राहीबाई पोपेरे यांनी गावरान देशी वाणांच्या 154 बियाणे जतन केले आहे. राहीबाई यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती, त्यांना 7 बहिणी आणि 1 भाऊ आणि पिता असा त्यांचा परिवार असायचा.

▪️ राहीबाई यांच्या आईचे लहानपणीच छत्र हरपल्याने घरातील कामांची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आली. त्यामुळे त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता आले नाही. लहानपणी त्यांनी जेष्ठ नागरिकांच्या चांगल्या गप्पा गोष्टीत ऐकल्याने त्यांच्या ज्ञानात अधिक भर पडला.

▪️ राहीबाई यांचे लग्न 12 व्या वर्षी लग्न झाले. त्यांनी शेतात काम करताना मनात कधीच मोठेपणा बाळगला नाही. लहानपणापासूनच त्यांनी कठीण परिस्थिती आणि प्रसंगात दिवस घालवले.

▪️ राहीबाईंनी त्यांच्या कार्यास सुरवात केल्यानंतर सुरवातीला बचत गटाने त्यांना प्रतिसाद न देता त्यांच्यावर हसायचे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी अखेर आपले ध्येय गाठले.

▪️ आजच्या काळात हायब्रीड खाण्याने रोगराईस आमंत्रण दिले जात होते. गावरान खाण्याने आपले आरोग्य सदृढ राहत अनुभव त्यांचा आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरातच सिडबँक सजवली असून आतापर्यंत मिळवलेले पुरस्कारदेखील त्यांनी ठेवलेत.

▪️ आरोग्य आणि शरीर आरोग्यदायी ठेवण्यासाठी कमी शिकलेल्या राहीबाईनी केलेल्या देशी गावरान 154 वाणांची जपवणूक केल्याबद्दल मागील वर्षी राहीबाई यांना भारत सरकारने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्कार दिला.

▪️ आज अखेर राहीबाईंच्या ‘देशी बियाण्यांच्या बॅंकेत’ एकूण 52 पिकांचे 154 वाण आहेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा ‘सीड मदर’ अर्थात ‘बिजमाता’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांना संबध महाराष्ट्रासह भारतात ‘बिजमाता’ नावाने ओळखतात.

▪️ राहीबाई यांच्याकडे सर्व प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे. हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही. राहीबाईकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्षे आपले पूर्वज खात होते ते मुळ स्वरूपात आहे.

▪️ त्यांच्याकडे फक्त वालाचेच वीस प्रकार उपलब्ध आहेत. त्यांनी तीन हजार स्रिया व शेतकरी यांचा बचतगट बनवला आहे. त्यांच्यामार्फत या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात व त्यांचे बियाणे मातीच्या पारंपरिक मडक्यात राख ठेऊन जतन केले जाते.

▪️ तब्बल तीन वर्षापेक्षा या बिया टिकून राहतात हा यामागचा उद्देश आहे. हे पारंपारिक चविष्ट व नैसर्गिक बियाणे मुळ नैसर्गिक स्वरूपात जगात कुठेच उपलब्ध नसल्याचा दावा राहीबाई पोपेरे यांनी केला आहे.

▪️ राहीबाई यांच्याकडे आतापर्यंत अमेरिका, गुजरात, भोपाळ, आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील अनेक नागरिक जतन केलेली बियाणे घेण्यासाठी भेट देतात. राहीबाईं यांच्या सिडबँकेत सद्यस्थितीत 52 पिकांचे 154 वाण आहेत.

▪️ यामध्ये भाताच्या बियाणांमध्ये रायभोग, जिरवेल, वरणगल, काळभात, आंबेमोहोर, ताम कुडाई, यांचा समावेश आहे. तर वालाच्या बियाण्यांमध्ये गोड वाल, कडूवाल, काळा वाल, एकपाताड्या वाल, यांचा समावेश आहे.

▪️ दरम्यान, राही बाई पोपरे यांचे कार्य समोर आल्यानंतर देशी बिया जतन करण्याची गरज का भासली? याची जाणीव आज प्रत्येकाला होत आहे.बाई पोपरे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*