‘जागतिक महिला दिन’ का साजरा केला जातो?

हसून प्रत्येक वेदना विसरणारी,
नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी,
प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी,
ती शक्ती आहे एक नारी…!

जगभरात दरवर्षी 8 मार्चला ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. आज असे एकही क्षेत्र नाही, ज्यामध्ये महिलांनी आपली छाप पाडलेली नाही. महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

सण 1909 पर्यंत महिला दिन 28 फेब्रुवारीला साजरा केला जात असे. आंतरराष्ट्रीय महिला वस्त्रे निर्मिती कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर या दिवशी महिला दिन साजरा केला होता. ऑगस्ट 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे कोपनहेगन येथे आयोजन केले होते.

Women’s Day – 8th March

याच परिषदेत जगभरात एक दिवस जागतिक महिला दिन साजरा केला जायला हवा, असे ठरविले होते. मात्र तो दिवस त्यावेळी निश्चित केला नव्हता. त्यानंतर 1914 मध्ये प्रथमच 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

त्यादिवशी रविवार असल्यामुळे हा दिवस निवडला होता. त्यानंतर 8 मार्चला जगभरात महिला दिन साजरा करण्याचा प्रघात पडला. महिला दिन हा कोणत्याही संघटनेचा म्हणून ओळखला जात नाही. जगभरातील वेगवेगळ्या देशांतील सरकारांकडून महिला दिन साजरा केला जातो. यानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.

महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने काही मार्गदर्शक तत्त्वे, कार्यक्रम निश्चित केले आहेत.

● जांभळ्या रंगाचे कनेक्शन : जांभळ्या रंगामागे इतिहास आहे. लिंग समानता म्हणजेच Gender Equality चे प्रतिक म्हणून या रंगाकडे पाहिले जाते. जांभळा रंग हा ‘महिला मुक्तता आंदोलन’ यांचे देखील प्रतिक आहे. स्त्रियांनी इतिहासात दिलेल्या त्यांच्या अधिकार आणि हक्काच्या लढ्यांमध्ये हाच जांभळा रंग प्रतिकात्मकतेने वापरला होता.

● जगभरात असा साजरा होतो महिला दिवस :
• अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनी सरकारी सुट्टी असते.
• रशिया आणि इतर काही देशांमध्ये या दिवसाच्या आसपास फुलांचे दर वाढतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाला स्त्री-पुरुष एकमेकांना फुले देतात.
• चीनमध्ये अनेक कार्यालयांमध्ये महिलांना हाफ डे म्हणजे अर्ध्या दिवसाची रजा मिळते.
• अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना ‘Women’s History Month’ म्हणून साजरा करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*