जागतिक ग्राहक हक्क दिन : वस्तू खरेदी करताना हे लक्षात ठेवाच!

दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो. एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना ग्राहकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या काय असतात, याविषयी जाणून घेऊयात ‘ही’ खास माहिती.

वस्तू खरेदी करताना ‘ही’ घ्या काळजी :

  • फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
  • वस्तू खरेदी करताना एम.आर.पी पेक्षा जास्त रक्कम देऊ नका.
  • वस्तूंची खरेदी करताना बिल मागणे हा ग्राहकांचा अधिकार आहे.
  • सोने खरेदी करताना हाॅलमार्ककडे लक्ष द्या.
  • डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.
  • वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासा.
  • पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा आणि त्यानंतरच पेट्रोल भरा.
  • ऑनलाइन खरेदी करताना सजग राहा.
  • वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.
  • ग्राहकांना संरक्षणाचा, माहिती मिळवण्याचा, निवड करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे.
  • अनेकदा खरेदी करतांना किंवा सर्विसेसचा वापर करतांना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच फायदा विक्रेते घेतात. त्यामुळे ‘जागो ग्राहक जागो’.

ग्राहकांचे हक्क :

सुरक्षिततेचा हक्क

जेव्हा ग्राहक एखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकांनी घेणे अनिवार्य असते. खरेदी केलेल्या वस्तूंच्या वापरामुळे शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झाल्यास कंपनीला त्याची नुकसान भरपाई द्यावी लागते.

माहितीचा हक्क

ग्राहकाला एखादी वस्तू किंवा सेवा घेण्यापूर्वी त्या संदर्भातली पूर्ण माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे.

निवडीचा हक्क

ग्राहकाला एखाद्या वस्तूची योग्य किंमत, गुणवत्ता याचा विचार करुनच वस्तूची निवड करण्याचा हक्क आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याचा अधिकार आहे.

तक्रार निवारणाचा हक्क

ग्राहकाला जर वाटत असेल की आपली फसवणूक झाली आहे तर, ग्राहकांला ग्राहक न्यायालयात तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे.

ग्राहक शिक्षणाचा हक्क

बाजारपेठेची व व्यापारी व्यवहाराची माहिती ग्राहकाला असणे आवश्यक आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती देण्यासाठी स्वयंसेवी संस्था शिबिरे किंवा कार्यशाळा घेत असतात.

आरोग्यदायी पर्यावरणचा हक्क

सदृढ जीवन जगण्यासाठी ग्राहकांना प्रदूषणापासून संरक्षण मिळविण्याचा हक्क आहे. याबरोबर मत प्रदर्शन करण्याचा ग्रहाकांचे प्रतिनिधित्व करण्याचा हक्क ग्राहकाला आहे.

फसवणूक झाल्यास काय

ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा याचे प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे.

ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे.

You might also like
Leave a comment