असा असावा उन्हाळ्यात डायट | Summer Diet Tips in Marathi

उन्हाळ्याच्या वातावरणात काहीही खातानाही काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक फळे खाऊन आपण उकाड्यापासून आराम मिळवू शकता. पण ते फळ किती आरोग्यदायी आहे? हे आधी जाणून घ्यायला हवे. त्यासाठी खालील माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल.

● उन्हाळ्यात उपलब्ध असलेले कलिंगड हे फळ आपल्या शरीराला केवळ आवश्यक पोषक आहार देत नाही तर पाण्याचे अभाव देखील पूर्ण करते. याने तुमचे हृदय मजबूत राहते. तसेच तुमचे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही.

● या हंगामात आपण नारळाच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे. कारण हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पोटातील सर्व प्रकारच्या आजारापासून आपले संरक्षण करण्यासाठी आणि आपल्याला थंड ठेवण्याचे कार्य नारळ पाणी करते.

● उन्हाळ्यात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यामध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात.

● दही थंड असते. ज्यामुळे ते गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून मुक्तता देते तसेच पचनक्रिया सुधारते, तोंडाचे अल्सर बरे करण्यास, पोटाची उष्णता कमी करणे, वजन कमी करणे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासही दही मदत करते.

● उन्हाळ्यात जास्तीत जास्त भाज्या खाणे आपल्या शरीरासाठी चांगले असते. यामुळे आपले शरीर थंड आणि शरीरात पाण्याची कमतरता कधीच होत नाही.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.

You might also like
Leave a comment