अशी करा गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना

यंदा गणेश चतुर्थी 22 ऑगस्ट दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सर्वांचे लाडके बाप्पा घराघरात, सार्वजनिक मंडळामध्ये विराजमान होतील.

घरगुती गणेशोत्सव हा किमान दीड, अडीच, पाच, सात आणि दहा दिवस साजरा केला आहे. दरम्यान, गणेश मूर्तीची परंपरेनुसार, विधीवत प्राणप्रतिष्ठा केली केली.

पूजेचा मुहूर्त

  • 22 ऑगस्ट 2020 रोजी गणपती बाप्पाचे आगमन होत आहे.
  • गणेश पूजा मुहूर्त : सकाळी 11:06 पासून दुपारी 01:42 पर्यंत
  • वर्जित चंद्र दर्शनाचा काळ : सकाळी 09:07 पासून रात्री 09:26 पर्यंत
  • चतुर्थी तिथि आरंभ : 21 ऑगस्ट शुक्रवारी रात्री 11 वाजून 02 मिनिटांपासून
  • चतुर्थी तिथी समाप्ती : 22 ऑगस्ट शनिवारी संध्याकाळी 07 वाजून 57 मिनिटांपर्यंत
  • स्नान करुन घरातील देवांची पूजा करुन नंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करावी.

श्रीगणेशाच्या पूजेसाठी आवश्यक लागणारे साहित्य

हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, सुपारी 10, खारीक 5, बदाम 5, हळकुंड 5, अक्रोड 5, ब्लाउज पीस 1, कापसाची वस्त्रे, जानवी जोड 2, पंचा 1, तांदूळ, तुळशी, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार 1, आंब्याच्या डहाळे, नारळ 2, फळे 5, विड्याची पाने 25, पंचामृत, कलश 2, ताम्हण 1, पळी, पंचपात्र, सुटे पैसे, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.

गणपती ही विद्येची देवता आहे. गणेश चतुर्थी दिवशी त्याची विधीवत पूजा करून त्याला प्रसन्न केले जाते.

कोणत्याही शुभ प्रसंगांमध्ये गणपती पूजेचा मान हा पहिला असतो. त्याच्या आशीर्वादाने दु:ख, समस्या, चिंता दूर होतात अशी अनेकांची भावना आहे.

देशात यंदा कोरोना व्हायरसचं सावट पाहता, गणेशोत्सव साधे पणाने साजरा करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

Leave a comment